NCP च्या गळतीची झळ दौंडपर्यंत, सुप्रिया सुळेंनी दत्तक घेतलेल्या आदर्शग्राम दापोडीत राष्ट्रवादीला ‘झटका’

पुणे (दौंड) : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – सुप्रिया सुळे यांनी आदर्शग्राम म्हणुन निवड केलेल्या गावातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार झटका बसला आहे. दौंड तालुक्यातील सुळे यांनी दत्तक घेतलेल्या दापोडी गावातील मा. उपसरपंच व विद्यमान सदस्य सिताराम देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार राहुल कुल यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळती लागल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राज्यात महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असताना या इनकमिंगची झळ थेट आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घरच्या मैदानात देखील बसू लागली आहे.
Dapodi
बारामती लोकसभा मतदार संघात असणाऱ्या दौंड मतदार संघाच्या दापोडी गावातील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिट्टी देणे स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीचे ठरणारे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना कांचन कुल यांनी कडवे आव्हान दिले होते. त्यांनतर दौंड विधानसभा मतदार संघात खुद्द शरद पवार यांनी बारकाईने लक्ष घालण्यात सुरुवात केली आहे. तरी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळती सुरूच राहिल्याने कुल गटात आनंदाचे वातावरण आहे.
Dapodi-Village
इनकमिंग सुरूच राहणार : आ.कुल
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने दौंड तालुक्यातील नागरिक विकासाचे बाजुने उभे राहणार असुन कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरूच राहणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
Dapodi-Village

आरोग्यविषयक वृत्त –