भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला मोठा झटका

माढा : पोलिसनामा ऑनलाइन – भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या आमदार शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजी – माजी आमदार सेने भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताहेत. मागील 25 वर्षे सत्तेवर राहिलेले आमदार बबनराव शिंदे हे सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या. मात्र विधानसभेला शिंदे भाजपकडून उभे राहिले तरी त्यांना पराभूत करू, असा इशारा युतीत सामील असलेल्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी दिला आहे.

भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका

माढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार बबनराव शिंदेंवर जोरदार तोफ डागली. लोकसभा निवडणुकीत एकजुटीने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पुनरावृत्ती घडवून शिंदेंना पराभव चाखायला लावण्याची हीच वेळ आहे,’ असं म्हणत शिवसेनेच्या प्रा. शिवाजी सावंत यांनी कोणत्याही परिस्थितीत शिंदेंचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. तसेच माढ्याची जागा ही शिवसेनेची आहे आणि याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे माहिती आहे.

सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू असतानाच दोन्ही शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं.

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्येही आमदार बबनराव शिंदे गैरहजर होते. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीद्वारे मदत न करता थेट मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like