आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षांतराच्या अफवा ! राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे पक्षांतर करत असल्याच्या अफवा विरोधकांनी पसरविल्या आहेत. आ. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीत होते व राहतील. आगामी विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप राष्ट्रवादी कडूनच लढतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

प्रा. विधाते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील पाच वर्षात शहरात अनेक कामे केली. धूळखात पडलेल्या आयटी पार्कमध्ये कंपन्या आणून युवकांसाठी रोजगार उपलब्ध केला. त्यामुळे धसका घेतलेल्या विरोधकांनीच त्यांच्या पक्षांतराबाबत अफवा पसरविल्या आहेत. मात्र, तसे काही होणार नाही. ते कुठल्याही पक्षात जाणार नाही.

sangram-jagtap

पक्षांतराच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत. स्वत: आ. संग्राम जगताप यांनीही कधी याबाबत वक्तव्य केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना चांगली संधी दिली. कमी वयामध्ये लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी पक्षात राहून शहरात अनेक विकास कामे करता आली. यापुढच्या काळातही शरद पवारांच्या बाजूनेच आमदार संग्राम जगताप हे उभे राहतील, असेही ते म्हणाले.

You might also like