नेहा पेंडसेने दिली ‘ही’ गोड बातमी ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नेहा पेंडसे हिने मराठी मध्ये नाही तर दक्षिणात्य त्याचबरोबर हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे. तिचा मित्र अभिनेता अभिजीत खांडेकर याने इन्स्टाग्राम वर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तोंडावर बोट ठेवले आहे. फोटोखाली शुभेच्छा देखिल दिल्या आहे. या शुभेच्छा नक्की का दिल्या आहे. हे आपण सविस्तर जाणून घेऊया…..

 

नेहा पेंडसेचा मित्र अभिजीत याने तिचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिला शुभेच्छा दिल्या आहे. याफोटोमध्ये तिच्यासोबत अभिजीत, श्रुती मराठे दिसत आहे. या फोटोमध्ये नेहा ने तोंडावर बोट ठेवले आहे. तिच्या फोटोवरुन असे वाटते की नक्कीच ती काहीतरी गोड बातमी देणार…. पण ती गोड बातमी नेमकी काय ? चाहत्यांना असे वाटते की ती तिच्या साखरपुडा किंवा लग्नाची गोड बातमी देते की काय ? त्यामुळे फोटोला चाहत्यांनी शुभेच्छा देखिल दिल्या आहे. तिने यावर उत्तर दिले आहे.

 

यावर नेहा म्हणते, लोक जे विचार करत आहे. तसे काहीच नाही. फोटो कॅप्शन मध्ये पाहून जे लोकांना प्रश्न पडत आहे. तसे काही नाही आम्ही मित्र- मैत्रिणी खुप दिवसातून भेटलो होतो. त्यामुळे आम्ही तो क्षण एन्जॉय केला. माझे लग्न किंवा साखरपुडा झाला नाही. मी बिग बॉस मराठी मध्ये एन्ट्री करत आहे हे देखिल खरे नाही. इन्स्टाग्राम वरील फोटो मध्ये आम्ही फक्त एन्जाॉय करत आहोच बाकी विषेश काही नाही. अशाप्रकारे तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. नेहाने बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. अभिनय क्षेत्रामध्ये तिच्या आईचा मोलाचा वाटा आहे. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.