नीरा नदीवरील नवीन पुलाला चीर पडल्याची सोशल मिडियावर ‘अफवा’

नीरा : पोलिसनामा आँनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – पुणे – सातारा जिल्हयाच्या सिमेवरील नीरा नदीवरील पुलाला चीर पडल्याची अफवा सोमवारी (दि.५) दिवसभर सोशल मिडियावर फिरत होती. त्यामुळे नीरा नदीला आलेल्या महापुरामुळे नीरा सह जिल्ह्यात नीरा नदीवरील पुल चर्चेचा विषय बनल्याने नागरिक भीती व्यक्त करीत होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.

वीर धरणातून नीरा नदीत सन १९९७ नंतर पहिल्यांंदाच १लाख २हजार ८०५ एवढा मोठा पाण्याचा विसर्ग सोडल्याने नीरा नदीला आलेला महापूर पाहण्यासाठी नीरा व परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले व शाळा, काँलेजला रविवारी व सोमवारी सुट्टी असल्याने तरूण, तरूणी, कुतुहलाने येत होते. त्यावेळी नीरा (ता.पुरंदर) येथून सातारा कडे जाणाऱ्या पुलावर बघ्यांची गर्दी वाढली होती. त्यावेळी नविन पुलाला चीर पडल्याची पोष्ट व फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नीरा सह जिल्हाभर याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे भीती व्यक्त केली जात होती.

नीरा नदीवरील पुलावर बंदोबस्तासाठी असलेले नीरा दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब बनकर यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने जेजुरीचे सपोनि अंकुश माने यांना माहिती देऊन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांशी संपर्क साधला. त्यानंतर काही तासातच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक गिरमे यांनी नीरा येथे येऊन नदीवरील पुलाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुलाच्या जाँईंट मधील
रबर तुटून त्यावरील डांबर निघून गेल्याने पुलाला चीर पडल्याचे दिसत असून पुल धोकादायक नसल्याचे सांगितले. तसेच सोशल मिडियावर व्हायरल होणारी पोष्ट अफवा असून नागरिकांनी घाबरू नये असे सांगितल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता अशोक गिरमे म्हणाले, पुलामध्ये तांत्रिकदृष्ट्या एक्झान्शेन जाँईंट ठेवलेले असते. त्यातील रबर तुटून त्यावरील डांबर निघून गेल्याने पुलाला चीर दिसत आहे. या पुलाचा वरिष्ठांना अहवाल सादर करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. याचा काहीही धोका नसून नागरिकांनी चिंता करु नये असे गिरमे म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –