नीरेत पोलिसांचे पथसंचलन

पुणे (नीरा) : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नीरा (ता.पुरंदर ) येथे जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पथसंचलन करण्यात आले.

नीरा पोलिस दुरक्षेत्रापासून लोणंद रोड, पालखी तळ, सातारा -नगर रोडवरून बुवासाहेब चौक, बारामती रोड, शिवाजी चौक मार्गे पुन्हा पोलिस दुरक्षेत्र असे पथसंचलन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने , फौजदार विजय वाघमारे, फौजदार नंदकुमार सोनवलकर, यांच्यासह ३३ पोलिस कर्मचारी १३ होमगार्ड या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like