निर्भया केस ! अक्षय सोबत ‘संबंध’ ठेवण्यासाठी केली जबरदस्ती, दोषी मुकेशचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषी मुकेशने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणातील अन्य दोषींसह तिहार तुरुंगात त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुकेश याने 1 फेब्रुवारी डेथ वॉरंट पुढे ढकलल्याबद्दल आणि राष्ट्रपतींच्या दया याचिकेविरोधात अपील केले होते. कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेशच्या वकीलाने दावा केला की, मुकेशला निर्भया प्रकरणातील आणखी एक दोषी अक्षय याच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले होते. राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळली आहे आणि फाशी टाळण्यासाठी ते विविध प्रकारचे डावपेच खेळत आहेत. सर्वोच्च न्यायालयात दिलेला हा युक्तिवाददेखील विलंबाचा भाग असू शकतो.

दरम्यान, निर्भया प्रकरणात 6 लोक दोषी आहेत. त्यातील एक असणाऱ्या रामसिंगने कारागृहातच आत्महत्या केली होती. आणखी एक अल्पवयीन शिक्षा भोगल्यानंतर बाहेर आला आहे. त्याचबरोबर चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात पवन गुप्ता, मुकेश सिंग, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर आहेत.

फेसबुक पेज लाईक करा