नितीन गडकरींना भर सभेत पुन्हा एकदा भोवळ

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतिल आयोजित सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली आहे. भोवळ आल्याने नितीन गडकरी शिर्डीहून रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिलला होणार आहे. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना – भाजपा युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधतांना नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक खालावली. आणि त्यांना भोवळ आली. भर सभेत भाषण करतेवेळी त्यांना भोवळ आल्याने सभा अर्ध्यावर सोडूनच शिर्डीतून रवाना झाले.

विशेष म्हणजे, याआधी देखील एका आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधतांना त्यांची प्रकृती खालावली होती. आणि त्यावेळेसही त्यांना भोवळ आली होती. ऐन सभेतच नितीन गडकरींना भोवळ आल्याने उपस्थतितांची पळापळ झाली. सध्या त्यांची प्रकुती स्थिर असून ते पुढच्या कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.