अपहरण झाल्यानंतर ‘त्या’ कॅब चालकाने ‘शक्कल’ लढवत करून घेतली स्वत:ची ‘सुटका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यात ओला कॅबचालकाचा खुन करुन गाडी पळवून नेण्याचा प्रकारा पाठोपाठ चाकण येथे दोघा जणांनी ओला कॅबचालकाला मारहाण करुन त्याचे अपहरण करीत त्याला डिक्कीत कोंबुन गाडी पळून नेत होते. सुदैवाने चालकाने गाडीचा वेग कमी झाला असताना डिक्कीतून उडी मारुन स्वत:ची सुटका करुन घेऊन आपले प्राण वाचविले. ही घटना चाकणमधील आंबेठाण रोडवर २१ जूनला पहाटे सव्वादोन वाजता घडली.

याप्रकरणी विशाल हनुमंतराव काळे (वय २७, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विशाल काळे हे ओला कॅब चालक आहेत. दोघा जणांनी ओला अ‍ॅपवरुन कॅब बुक केली होती. पुण्यातील कात्रज येथील के. के. मॉल चौकातून २० जूनला रात्री अकरा वाजता ते दोघांना घेऊन चाकणला निघाले.

मध्यरात्री आंबेठाण चौक येथे आल्यावर त्या दोघांनी विशाल काळे यांच्या डोक्यात, हातावर, पायावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना डिक्कीमध्ये टाकले व गाडी घेऊन ते जात होते. आपल्या जीवाचे ते बरेवाईट करणार हे त्यांच्या लक्षात आल्यावर विशाल याने आतून डिक्की उघडली. एके ठिकाणी गाडीचा स्पीड कमी झाल्याचे दिसताच त्यांनी डिक्कीतून उडी घेऊन स्वत:ची सुटका करुन घेतली. चोरटे ४ लाख रुपयांची अक्सेंट कार घेऊन पळून गेले आहेत.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’