पुणे जिल्हयातील शिरूरमध्ये १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा जप्‍त, परिसरात प्रचंड खळबळ

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड) – तालुक्यातील टाकळी हाजी निघोजकुंड येथे १ कोटी २६ हजार रूपयांच्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा सापडल्या असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली आहे.

गणेश शिवाजी कोळेकर (२५, रा. संविदणे, ता. शिरूर), समाधान बाळू नरे (२१) आणि अमोल देवराम दसगुडे (२५, रा. कर्डिलवाडी, ता. शिरूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबतची माहिती अशी की दि. ८ जून रोजी टाकळीहाजी निघोज कुंड परिसरात शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस हवालदार चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल हराळ हे रात्री १ वा. २० वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना कवठे येमाई तालुका शिरूर गावच्या हद्दीत हुंड्राई कंपनीची कार एम एच १४ EU ११९४ हि रोडच्या कडेला उभी असल्याचे आढळून आले त्यामुळे आल्याने संशय आल्याने पोलीस वाहन उभे करून कारची तपासणी केली असता कारमध्ये वरील तीन आरोपी आढळून आले व ड्राइवर सीटच्या मध्ये बॅग सापडली त्यामध्ये जुन्या चलनी बंद पडलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या सुमारे १कोटी सव्वीस हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्याने त्याबाबत चौकशी केली असता सदर आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे शिरूर पोलीस ठाण्यात त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास शिरूर ते पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.