२०२० नंतर देशात जुन्या वाहनांना ‘नो एंट्री ‘ ; पण ‘भंगार’ योजनेत नव्या वाहनासाठी आर्थिक मिळणार सवलत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०२० नंतर १५ व २० वर्षापेक्षा अधिक जुनी असलेली सर्वप्रकारची वाहने रस्त्यावर आणू द्यायची नाहीत असे संकेत केंद्र सरकारने दिले असून काही वाहन उत्पादक कंपन्यांच्या साहाय्याने जुन्या वाहनांसाठी भंगार योजना राबविताना वाहनधारकाला नवीन वाहन घेण्यासाठी आर्थिक सवलत देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.

एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार जुन्या वाहनांचे प्रमाण कमी व्हावे तसेच जुनी वाहने भंगारात घालण्यासाठी आकर्षक योजना तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जुनी वाहने मोडीत घालण्यासाठी भंगार योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.

काय आहे प्रस्ताव ?
भंगार योजनेच्या नियमावलीमध्ये २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे वापरात असलेल्या व्यावसायिक वाहनांच्या मालकांनी आपली वाहने भंगारात घालून नव्या वाहनांची खरेदी करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना आर्थिक सवलत देण्यात येईल.

१५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या व्यावसायिक वाहन भंगारात घातल्यानंतर पंधरा लाख रुपयांपर्यंतचे नवे व्यावसायिक वाहन खरेदी केल्यास संबंधिताला पाच लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येईल.
हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सध्या रस्त्यावर धावणारी २.८० कोटी वाहने भंगारात निघण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ग्रेटर नोएडामध्ये पहिला प्रकल्प
‘महिंद्रा आणि महिंद्रा’ कंपनीने ‘एमएसटीसी’ या सरकारी कंपनीच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासून जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून ‘सिरो'(सीईआरओ) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीने जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठीचा पहिला प्रकल्प ग्रेटर नोएडामध्ये उभारला आहे.

आरोग्यविषयक वृत्त
चेस्ट आणि अंडरआर्मचे केस काढण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

अवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा