कांद्याच्या भावावरून वाद, भाजी विक्रेत्यानं पती पत्नीवर केले चाकूनं ‘वार’, पुढं झालं ‘असं’

जालंधर : वृत्तसंस्था – कांद्याला घेऊन अख्खा देश परेशान झाला आहे. जालंधर शहरातून कांद्याला घेऊन विचित्र घटना घडली आहे. कांद्याच्या किंमतीवरून भाजी विक्रेता आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, भाजी विक्रेत्याने कांद्या खरेदी करणाऱ्या पती पत्नीला चाकू मारला. 120 फुटी रोडवर लागणाऱ्या भाजी मंडीतील ही घटना आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

सिव्हील हॉस्पिटल मध्ये गेलेल्या बस्ती शेख मधील रहिवासी मनोज आणि त्याची पत्नी कल्पना रात्री भाजी खरेदी करण्यासाठी मंडईत गेले होते. तिथे सुरेंद्र नावाच्या भाजी विक्रेत्याला तिने कांद्याचा भाव विचारला. त्यानं कांद्याचा भाव 80 रुपये सांगितला.

जेव्हा ते म्हणाले की, कांद्याचा भाव 70 रुपये किलो असावा त्यावर सुरेंद्र मात्र कल्पनासोबत भांडू लागला. तिने त्याला थांबवताच त्याने शिवीगाळ सुरू केली. दोघे पती पत्नी जेव्हा तिथून जाऊ लागले तेव्हा त्याने चाकूने दोघांवरही वार केला. या घटनेची सूचना ठाणे 5 च्या पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप काय कारवाई केली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

Visit : Policenama.com