93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत गोरोबाकाका यांच्या विचारांचा वारसा

उस्मानाबाद : पोसीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत गोरोबाकाका यांच्या विचारांचा वारसा साहित्यिकाच्या समोर वेगवेगळ्या प्रकाराने मांडण्यात येत असून संत गोरोबाकाका यांच्या दारी आली साहित्याची वारी. या समेलन गीताप्रमाणेच इथ हुबेहूब चित्र या संत गोरोबाकाका साहित्य नगरीक दिसत आहे.
 Sant Goroba Kaka
संत गोरोबाकाका यांच्या पारंपारिक कुंभार व्यवसायाचा देखावा साहित्यिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. संत गोरोबा काकांचे घर मडकी तसेच मातीची भांडी कुंड्या तयार करण्याचा देखावा त्यासाठी लागणारी माती आणि इतर साहित्य यासह प्रत्यक्ष चाकावर मातीला आकार देऊन होणाऱ्या मातीच्या विविध आकारातल्या कलाकृती तयार करण्याची कला आणि त्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाशिक्षक शेषनाथ वाघ आणि राजेंद्र कुंभार यांनी हा देखावा उभारला आहे.
या संमेलनात पुस्तकांमधून संत गोरोबाकाका यांची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती सुद्धा साहित्यप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.

विविध पुस्तकांच्या विक्रीची जवळपास दोनशे दालनं उभारण्यात आली असून उस्मानाबाद सहा आसपासच्या जिल्ह्यातल्या देशभरातल्या साहित्यप्रेमी आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुस्तकांची साहित्य फेरी, साहित्य खरेदी यासाठी गर्दी केलेली दिसत आहे. यात पुस्तक खरेदीवर बऱ्याच पुस्तक प्रकाशकांनी 10 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिलेली दिसत असून मराठी वाचन चळवळ वाढीस लागण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी होताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/