प्रा. तानाजी सावंत यांच्या रुपाने उस्मानाबादला मिळाला पूर्णवेळ पालकमंत्री

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रीपद नसल्याने मागील साडेचार वर्षे जिल्ह्याला बाहेरुन आलेले पालकमंत्री देण्यात आले होते. त्यांमुळे त्यांची ओळख केवळ झेंडावंदन मंत्री म्हणूनच जिल्ह्यात झाली होती. प्रा. तानाजी सावंत यांचा पर्य़ाय उपलब्ध होताच शिवसेनेने अर्जून खोतकर यांच्याजागी सांवंत यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली.

मागील अनेक दिवसांपासून तानाजी सावंत पालकमंत्री होणार याची चर्चा व पोस्टर जिल्ह्यात झळकत होते. राज्यातील नव्या मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्यातील वजनदार समजले जाणारे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते प्रा. तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडे जलसंधारण विभागाचा कारभार सोपवण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सावंत यांची उस्मानाबादचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळाला असला तरी उर्वरीत दोन महिन्यात जिल्ह्यातील केणत्या कामांना ते प्राधान्य देतात हे पहावे लागणार आहे.

तानाजी सावंत यांची यापूर्वी उस्मानाबादच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागाशी त्यांचा फारसा संबंध नव्हता. जिल्ह्यामध्ये कमी वेळ दिल्याने शिवसेनेचे कार्य़कर्ते नाराज झाले होते. त्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांच्यानंतर दिवाकर रावते यांच्याकडे पालकमंत्री पद सोपवण्यात आले. परंतु त्यांचे देखील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पटले नाही. वर्षभरातच रावतेंना या पदावरून हटवून त्यांच्या जागी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची नेमणूक करण्यात आली होती.

खोतकर यांना जालना जिल्हा सांभाळून उस्मानाबाद जिल्ह्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नव्हता. त्यामुळे पूर्णवेळ पालकमंत्री द्यावा अशी मागणी होत होती. खोतकर यांच्यानंतर तानाजी सावंत यांचा पर्य़ाय उपलब्ध होताच शिवसेनेने अर्जुन खोतकर यांच्या जागी सावंत यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –