ज्या कोठडीचं ‘उद्घाटन’ दिमाखात केलं तिथंच काढली पी. चिदंबरम यांनी वैऱ्याची ‘रात्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्याबाबत एका वर्तुळ पूर्ण झाले आहे. कोणत्याही वास्तूचे उद्घाटन केल्यानंतर त्यात प्रमुख पाहुणे सर्वप्रथम प्रवेश करतात. पी. चिंदबरम यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पोलीस कोठडी असलेल्या सीबीआयच्या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री असताना केले होते. त्यावेळी कोणीही भविष्यवाणी केली असती तरी ती खरी मानली गेली नसती की, एक दिवशी याच कोठडीत केंद्रीय गृहमंत्र्यांना रहावे लागेल.

पण काळाची पावले उलटी फिरली की दैवही साथ देत नाही, असाच अनुभव सध्या पी चिंदमबरम यांना येत असेल. पी चिंदमबरम हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून विधी शिक्षण पूर्ण केले असून हार्वड बिझनेस स्कुलमधून त्यांनी १९६८ मध्ये एमबीए केले आहे. त्यांनी मद्रास व दिल्ली उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे.

चिदंबरम यांनी राजकारणात प्रवेश केला व १९८४ मध्ये ते शिवगंगा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १९८९, १९९१, १९९६, १९९८, २००४ आणि २००९ मध्ये निवडून आले होते. १९९६ आणि २००४ मध्ये अर्थमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी २००८ मध्ये त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद सोपविले. गृहमंत्री असताना दिल्लीत सीबीआयची नवीन इमारत उभारण्यात येत होती.
भारतातील न्यायालये, पोलीस कोठड्यांची अवस्था अतिशय घाणेरडी असतात, असा आरोप नेहमीच हायप्रोफाईल आरोपी करत असतात. विशेष:त परदेशातून आरोपीचे हस्तांतर करण्याच्या वेळी हा आरोप हमखास केला जातो. हे लक्षात घेऊन सीबीआयच्या या इमारतीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार येथे पोलीस कोठडी बांधण्यात आली आहे.

या इमारतीचे उद्घाटन २०११ मध्ये पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी विधी व न्यायमंत्री विरप्पा मोईलीही उपस्थित होते. त्याच कोठडीत पी चिदंबरम यांना रात्र काढण्याची वेळ आली.