‘कंगाल’ पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या ‘बळकटी’साठी इम्रान खानांचे प्रयत्न, सैन्याच्या खर्चास ‘कात्री’

 पोलीसनामा ऑनलाइन टीम – पकिस्तानला आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने अखेर नाईलाजास्तव सैन्याच्या खर्चात कपात करावी लागली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्विट करत या संबंधित माहिती दिली. सुरक्षेसारखा गंभीर मुद्दा असताना आर्थिक संकंटाच्या या परिस्थितीत सैन्याने आपल्या खर्चात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल मी सैन्यांचे स्वागत करतो. यातून वाचलेले पैसे आपण बलुचिस्तान आणि कबायली या भागात खर्च करु.

पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी देखील ट्विट करत यावर आपले मत व्यक्त करत देशाच्या सुरक्षेवर याचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका वर्षी सेनेच्या डिफेंस बजेटमध्ये कपात केल्याने देशाच्या सुरक्षेवर यांचा काही परिणाम होणार नाही. आम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ. तीन सेवा या कपात झाल्याच्या परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न करेल. बलुचिस्तान आणि आदिवासी भागांच्या उन्नतीसाठी हे पाऊल उचलने महत्वपुर्ण होते.

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मिडियावर पाकिस्तानचे कौतूक होताना दिसत आहे.
परंतू पाकिस्तानी सैन्याने फेब्रवारीमध्ये सैन्याच्या खर्चात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचा निर्णय घेतला होता. भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईल केल्यानंतर पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले होते की, इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानचे डिफेन्स बजेट कमीच आहे. त्यामुळे सैन्याचे बजेट वाढवण्याची गरज आहे ना की कमी करण्याची. आपल्याला आपले सुरक्षा धोरणांचा विचार करता सैन्यांचे बजेट वाढवण्याची गरज आहे.

परंतु त्यानंतर पाकिस्तान पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार हफीज शेख यांनी सांगितले होते की, यंदाचे बजेट हे अडथळा निर्माण करणारे असणार आहे आणि आपण सरकारी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

किती आहे पाकिस्तानचे डिफेंस बजेट ?
स्टोकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्युटने केलेल्या रिपोर्टनुसार 2018 च्या बजेट नुसार पाकिस्तानचा एकूण सैन्याचा खर्च 11.4 अब्ज डॉलर राहिला आहे. हा खर्च पाकिस्तानच्या जीडीपीच्या 4 टक्के इतका आहे. 2018 साली भारतीय सैन्याचा खर्च 66.5 अब्ज डॉलर राहिला आहे. तर अमेरिका यात पहिल्या स्थानी असून अमेरिकेचा सैन्य खर्च हा 649 अब्ज डॉलर एवढा आहे.

पाकिस्तान कर्जबाजारी – तर IMF या संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पाकिस्तानवर पहिल्या बेलआऊटपासूनच 5.8 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. तसेच पाकिस्तानला चीनने मोठ्या व्याजाने कर्ज दिले आहे आणि येणाऱ्या काळात या कर्जाचा बोजा पाकवर वाढण्याची शक्यता आहे.