विदेशातील अनेकांना कोट्यावधीचा ‘गंडा’ घालणारा पंकज डडलाणी उल्हासनगर पोलिसांच्या जाळ्यात

भाईंदर : पोलीसनामा ऑनलाइन – बँकांना आणि लोकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून विदेशात आश्रय घेतल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये निरव मोदी आणि विजय माल्ल्या साऱख्यांनी भारतातील बँकांचे कोट्यावधी रुपये बुडवून देशाबाहेर पलायन केले. मात्र उल्हासनगर पोलिसांनी अटक केलेल्या पंकज डडलानी याने विदेशातील लोकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून भारतात आश्रय घेतला. पंकज डडलानी हा आंतरराष्ट्रीय धोकेबाज असून त्याने कॅलिफोर्निया आणि दुबईतील लोकांना दुप्पट रक्कम करुन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

विदेशात अनेक लोकांची फसवणूक केल्यानंतर तो भारतात आला. त्याने मायानगरी मुंबईसह मिरा-भाईंदर जवळील शहरातील लोकांची देखील कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. पंकजने देश-विदेशातील तब्बल दोन हाजार लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी फेसबूकवर पंकज डडलाणी याने फसवणूक केल्याची पोस्ट टाकली आहे. जेणेकरून इतरांची फसवणूक होणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकजने कॅलिफोर्निया येथील नागरिकांना ऑनलाईन ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास एका आठवड्यात दीडपट पैसे परत करण्याचे आमिष दाखवले होते. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पंकजने दीडपट रक्कम दिली. त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना त्याच्यावर विश्वास बसल्याने अनेकांनी कोट्यावधी रुपये त्याच्याकडे गुंतवले. मात्र त्याने पैसे परत न करता तेथून पसार झाला. यानंतर त्याने दुबईत आपले बस्थान मांडले. या ठिकाणी देखील त्याने कॅलिफोर्नियात ज्या प्रकारे लोकांना फसवले तसेच दुबईत देखील लोकांना फसवले.

दुबईत लोकांची फसवणूक केल्यानंतर दुबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने २००८ ते २०११ दरम्यान तुरुंगात रवानगी करण्यात आली. तसेच त्याला दुबईत येण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे त्याने भारतात आला. भारतात आल्यानंतर मायानगर मुंबईसह मिरी-भाईंदरजवळील शहरात आपला फसवणूकीचा धंदा पुन्हा सुरु केला. फसवणूक झालेल्या लोकांनी ठाणे पोलीस ठाण्यात पंकज डडलानीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावेळी त्याला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्याला चार महिन्यांची शिक्षा झाली. दरम्यान, उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर उल्हासनगर पोलिसांनी पंकजला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

You might also like