…त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा मी माध्यमांकडूनच ऐकत आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज जामखेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याने रिकाम्या झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुंडे यांचे नाव चर्चेत आले आहे. आज चौंडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पंकजा मुंडे यांना छेडले असता त्या म्हणाले की, ‘प्रदेशाध्यक्ष पदाबाबत माझ्या नावाची चर्चा मी माध्यमांकडूनच ऐकत आहे. मात्र, मला याबाबत माहिती नाही. त्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पाहुयात काय होतय ते.’