धरणातून पाण्याचा विसर्ग आणि अतिवृष्टीने गोदापाञ तुडुंब

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परतीचा पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहेत गोदापाञ परिसरातील शिवारात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे त्यामुळे कापूस सोयाबीन ज्वारी या पिकांना फटका बसला आहे. हाताला आलेली पिके जाण्याच्या मार्गावर असल्याने ऐन सणासुदीच्या वेळी शेतकरीवर्गाला आर्थिक फटका बसला आहे. परिसरातील पिकांचे त्वरित पंचनामे करून महसूल प्रशासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.

मराठवाड्यात ठिकठिकाणी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने आणि औरंगाबाद जिल्ह्यातील नाथ सागर धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे गोदावरी पात्रात तुडुंब वाहत आहे मागील तीन ते चार दिवसापासून परभणी जिल्ह्यासाठी पाथरी तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद येथील धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि परिसरात पडलेल्या पावसाने गोदावरी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

त्यामुळे गोदावरील वरील लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रणात असलेले उच्च पातळी बंधाऱ्याचे काही गेट वरती करण्यात आले आहेत पाथरी तालुक्यातील नारा, ढालेगाव, मुदगल, उच्च पातळी बंधारा ची काही गेट वरती करण्यात आले आहेत अतिवृष्टी व विसर्गचे येणारे पाण्याची आवक पहाता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा विसर्ग पुढे सुरु आहे.