Exit Poll 2019 : परभणीत ‘बॉस’ की ‘दादा’ ?

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) – देशातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. उद्यावर होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे. मतदारांमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तर उमेदवारांमध्ये निकालाची धाकधुक दिसून येत आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या २३ मे रोजी या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतमोजणीद्वारे होणार आहे. याची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे दिसून येत आहे. निकालाच्या उत्सुकतेपोटी मतदारांमध्ये, जिसका मुझे था इंतजार वो घडी आगयी है असेच काहीसे दिसत आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली

परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव (बॉस) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आखाड्यात उतरलेले राजेश विटेकर यांच्यात खरी लढत आहे. शिवसेना बालेकिल्ला राखणार का ? राष्ट्रवादी हा मतदार संघ शिवसेनेच्या हातून हिरावणार का ? हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार. शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे भवितव्य वंचित बहुजन आघाडीवर अवलंबून ठरणार आहे.