परभणीत तापमानाची ऐतिहासिक नोंद

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) –  एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात रविवारी तापमानाची एतिहासिक नोंद झाली. येणार्‍या महिन्यातही तापमानात वाढ होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. काल रविवारी 28 एप्रिल रोजी भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. आतापर्यंतच्या तापमानातील हि ऐतिहासिक नोंद ठरली आहे. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने रविवारी 45.5 अंश कमाल तापमानाची नोंद घेतली आहे. तर या विभागाकडे असलेल्या तिस वर्षातल्या रेकार्डप्रमाणे एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होण्याची नोंद घेण्यात आली आहे.

प्रखर उन्हामुळे सर्व सर्वांना सावली शोधण्याची वेळ आली आहे. अंग भाजणाऱ्या उन्हामुळे शेतातील मशागतीच्या कामाला फटका बसत आहे. परभणी, सेलु, जिंतूर, पुर्णा, पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, या शहरासह ग्रामीण भागात पडत असलेल्या प्रखर उन्हामुळे बांधकाम व शेतीच्या कामांना फटका बसू लागला असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बाहेर पडण्याचे टाळले जात आहे.