‘त्या’ खंडणी मागणार्‍या पोलिस निरीक्षकावर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा ‘इशारा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणारे पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर कारवाई न झाल्यास पारनेर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब माळी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

माळी म्हणाले की, न्यायप्रविष्ट दिवाणी बाबींत न्यायायलायचा निरंतर ‘स्टे’ असताना खोट्या फौजदारी गुन्ह्यात कारवाई करून पत्नीसह मुलांना अटक करण्याची धमकी दिली. अटक टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली, अशी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र याबाबत साधी चौकशीही झालेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पारनेरच्या पोलिस निरीक्षकावर कारवाई झाली नाही, तर पारनेर पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करण्यात येईल.

‘ते’ संभाषण ऐकविले –
या पत्रकार परिषदेत माळी यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोवार व तक्रारदार माळी यांच्यात झालेले संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकविले. त्यामुळे आता पोलिस अधीक्षक ईशू सिंधू हे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –