‘सक्तीचा ‘बिमोड’ करावा’, व्यापारी वर्गाचे पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे ‘साकडे’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मंडळं तयारीला लागली आहेत. त्यातच वर्गणीच्या नावाखाली गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा करणे, अवाजवी रकमेच्या पावत्या देणे अशा घटना घडत आहेत. या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन दिले आहे.

सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत पारोळ व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाल माने म्हणाले, व्यापारी वर्ग नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत कार्य करतो. मदतीचा हात देतो. परंतू व्यापारी वर्गाला धमकावणे, सक्ती, खंडणी वसुलीचा प्रकार होत आहे. तो थाबवावा व जबरी प्रवृत्तीचा अटकाव करावा. आमचे संकट दुर करावे असे निवेदन देताना माने म्हणाले.

यावेळी राजेंद्र तनेजा, विकास देवभानकर, पुना गाडगिळ, राजकुमार तनेजा, जय कराचीवाला, मनोज गुंडियाल, संदिप गवळी, राजेश गुंडियाल, विरेंद्र तायडे, कपिल तनेजा आदी जण उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –