दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

पाथरी :  पोलीसनामा ऑनलाइन – शहर व ग्रामीण भागातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मागील कित्येक दिवसापासुन घडत आहेत. दुचाकी चोरीला जाण्याच्या प्रकाराला पोलीस माञ आळा लावू शकली नसल्याचे दिसते. पाथरी पोलीस ठाण्या हद्दीत व अंतर्गत चोरी व घरफोड्याच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे.

या गुन्ह्य़ातील बहुतांश चोरटे पोलीसांना सापडलेच नाहीत, चोरटेच सापडत नसल्याने चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध लागत नाही, वर्दळीच्या ठिकाणांहून हॅन्डल लाॅक केलेली दुचाकी काही क्षणातच गायब केली जाते, त्यामुळे नागरिकांमध्ये धस्ती निर्माण झाली आहे. मोबाईल चोरीच्या घटनां सारख्या दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोरटे का सापडत नाही असा संतप्त सवाल नागरीकांकडुन विचारला जात आहे. चोरीला गेलेली दुचाकी परत मिळविण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.

अवैध विक्रीवर हवा वाॅच

ग्रामीण भागात कमी किमतीत जुन्या दुचाकीची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत, पोलीसांनी अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.अनेकदा बनावट कागदपत्रे तयार तयार करून चोरीच्या दुचाकीची विक्री केली जाते, कमी किमतीत दुचाकी मिळत असल्याने कागद पञांशिवाय खरेदी केली जाते.

पाथरी पोलीस ठाण्या समोरून शहरातील व ग्रामीण भागातून विना नंबर प्लेट च्या अनेक दुचाकी जा-ये करतात परंतु पाथरी पोलीस वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करतेविना नंबर प्लेट दुचाकी स्वाराकडुन शंभर पन्नास रुपये उकळण्याचे काम केले जाते अशी चर्चा शहरात सुरू आहे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like