‘यंञ चालक’ पवन इंगळे यांना निरोप

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी उपविभागाच्या अंतर्गत (33 केव्ही) उप केंद्र बाभळगाव (पेठ) येथील यंत्र चालक पवन इंगळे पाटील यांची बदली झाल्याने त्यांना शुक्रवारी बाभळगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रात कर्मचारी व ग्रामस्थाकुन निरोप देण्यात आला.

यंत्र चालक पवन इंगळे पाटील यांची बाभळगांव येथून सांगली जिल्ह्यातली तासगाव तालुक्यातील निमनी येथे बदली झाल्याने शुक्रवारी त्यांना भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी यंञ चालक रवी दैठणकर, यंत्र चालक मंगेश काळे, भगवान सोगे, अशोक गिराम, गणेश वाघमारे, रामभाऊ गिराम, यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र माझी जन्मभूमी असून, मराठवाडा ही कर्मभूमि आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माणिक वावधाने, शंकर गिराम, शञुघ्न गिराम, कुंडलीक गिराम, मारुती पानपत्ते, बालासाहेब गिराम, अजीम बागवान, श्याम गिराम, नवनाथ गिराम, मुगाजी सोनटक्के, आदींसह इतरांची उपस्थिती होती. यावेळी भगवान सोगे यांनी आभार मानले.

शाहरूख खानची मुलगी सुहानाला मिळाला ‘हा’ बहुमान

Video : पती सैफ अली खानच्या गाण्यावर ‘बेबो’ करिना कपूरचा ‘जलवा’

रक्तचाचणीद्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

या पाच गोष्टींचा ‘आहारा’त करा वापर, शरीर होईल निरोगी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन