‘बहुत हुई पेट्रोल -डिझेल कि मार’ आता दरवाढीचा भडका उडणार

दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका व इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसल्याने तसेच, ओपेक देशांकडून पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात भारतात पेट्रोल – डिझेल दरवाढीचा भडका उडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले असतील.त्यामुळे’बहुत हुई पेट्रोल -डिझेल कि मार ‘हा मुद्दा पुन्हा राजकीय वर्तुळात गाजण्याची दाट चिन्हे आहेत.

येत्या काही दिवसांत कच्च्या इंधनाचे दर प्रतिबॅरल 90 अमेरिकी डॉलरपर्यंत उसळी घेतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होणार असून देशांतर्गत पेट्रोल व डिझेल दरात आणखी भडका उडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी इंधन कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली होती.

उलटपक्षी, गेल्या 10 दिवसांत पेट्रोलचे दर 1.80 रुपयांनी तर, डिझेलचे दर 63 पैशांनी कमी झाले होते.मात्र अखेरच्या टप्प्याच्या मतदानानंतर इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पेट्रोल ५ तर डिझेल ९ पैशांनी महागले . मुंबईत पेट्रोलचा दर 76.78 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 69.36 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे

Loading...
You might also like