खुशखबर ! पेट्रोल-डिझेल ‘यामुळे’ आणखी स्वस्त होण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मोदी २. ० सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ९ डॉलरनी कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाही तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या.

२९ मे पासून सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये घसरण होत आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल जर असेच घसरत राहीले तर भारतात इंधनाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बेंचमार्क क्रूड ऑइल ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुमारे १० डॉलर प्रति बॅरल घट झाली आहे. बॅरलचे दर कमी झाल्यास त्याचा थेट फायदा भारताला होणार आहे. कारण भारत त्याच्या गरजेच्या ८४ % तेल आयात करतो.

पेट्रोल आणि डिझेलचा व्यापार हा डॉलरमध्येच होत असतो. भारत प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे तेलाच्या आयातीवर खर्च करतो. डॉलर घसरल्याने तेलाच्या किंमती कमी होतील. आपल्याला कमी पैसे द्यावे लागतील. डॉलरचा भाव १ रूपयाने वाढला तर तेल कंपन्यांवर८ हजार कोटींचा बोजा पडतो. महागाईही वाढते. आता तेल डॉलरच घसरल्याने सर्वच गोष्टींचा फायदा होईल.