पिंपरेखुर्द येथे 33 ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा शाळा प्रवेशोत्सव

नीरा : पोलिसनामा आँनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – पिंपरेखुर्द (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऊसतोडणी मजुर व इतर स्थलांतरित मजुरांच्या मुलांचे मंगळवारी (दि. ४) ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुरंदरचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, टाटा ट्रस्टस् चे कार्यक्रम अधिकारी परेश जयश्री मनोहर तसेच जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते ३३ मुलांना शालेय साहित्य व गणवेश देऊन शाळा प्रवेश देण्यात आला.

सोमेश्वर सह. साखर कारखाना कार्यक्षेत्रात मागील तीन वर्षा पासून शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट मुंबई आणि जनसेवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ‘आशा प्रकल्प’ चालू आहे. पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, सुकलवाडी, पिसुर्टी या परिसरामध्ये ऊसतोडणी कामगारांसह वीट भट्टी कामगार रोजगारासाठी आले आहेत. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता गेल्या तीन वर्षापासूनआशा प्रकल्पातर्गत मुलांना शाळा प्रवेश देण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर पिंपरेखुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि.२४)झालेल्या कार्यक्रमात सुकलवाडी – दोन, पिसुर्टी आकरा , थोपटेवाडी तीन, पिंपरे खुर्द सतरा अशा एकूण तेहतीस मुलांना शालेय साहित्य व गणवेश देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी परेश जयश्री मनोहर म्हणाले की, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शाळेची गोडी लागावी, त्यांनी शाळेत नियमित यावे अशी सोय सरकारने करावी यासाठी आशा प्रकल्प प्रयत्नशील आहे असे सांगुुुन
प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगितली.

पुरंदरचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत म्हणााले की,स्थलांतरित मुलांना आपलेपणाने वागवले पाहिजे. त्यांना आपण बाहेरून आलो आहे याची जाणीव होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी सूचना करून बीड येथे शिक्षक असल्याचा अनुभव उपस्थित लोकांसमोर मांडला.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, ही मुले आपल्यासाठी पाहुणे असल्यासारखी आहेत. आपण घरातल्या पाहुण्यांचीजशी काळजी घेतो तशी काळजी आपण या मुलांची घेतली पाहिजे. तेव्हाच या मुलांना शाळेचा लळा लागेल आणि ती मुले रमतील. आशा प्रकल्प करत असलेले काम निश्चित वाखाणण्याजोगे आहे. असे सांंगून आशा प्रकल्पातील सर्व सहकार्यांना जेव्हा गावातील समाज आणि यंत्रणा यांची मदत मिळेल तेव्हाच ऊसतोडणी मजुरांना कारखाना परिसरातील गावे आपली वाटतील. आपण त्या दृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालयांनी केले. केंद्रप्रमुख सुरेश लांघी, जगदाळे मँडम, तांबेकर सर, स्वाती माळवदकर, राजेंद्र बरकडे, पिंपरे खुर्द शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, क्षेत्र समन्वयक अजहर नदाफ, फलटण खंडाळा- तालुका क्षेत्र समन्वयक नवनाथ चोरमले, विवेक बरकडे, वैभव थोपटे, जिल्हा परिषद शाळा थोपटेवाडी, पिसुर्टी, पिंपरे खुर्द येथील शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.