जेवण वाढण्यास उशीर झाला म्हणून केली बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरात एक वेगळाच प्रकार घडला आहे. पत्नीने जेवण वाढण्यास उशीर केला म्हणून पतीने दगडाने मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. हा प्रकार यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथे घडला.
याप्रकरणी वीस वर्षे महिलेने तळेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

श्रीकांत मनोज उपाध्ये (२३, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत बुधवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. पत्नीला जेवण वाढण्यासाठी थोडा उशीर झाला.

यावरून श्रीकांत त्याने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घराबाहेर पडलेल्या दगडाने पत्नीला मारले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तळेगाव पोलिसांनी श्रीकांत याला अटक केली. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

Loading...
You might also like