विधानसभा 2019 : पिंपरी पालिकातील ‘या’ 17 नगरसेवकांना आमदारकीचे ‘वेध’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनालाइन – औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या आणि श्रीमंत महापालिकेमुळे वेगळी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 17 नगरसेवाकांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आज पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील तब्बल 17 नगरसेवकांनी आपापल्या पक्षाकडे इच्छूक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांचा समावेश आहे. यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.

पिंपरी विधानसभा-
पिंपरी विधानसभेची 2009 मध्ये फेररचना झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आण्णा बनसोडे हे पहिले आमदार झाले. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती फिसकटल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून तिकीट पदरात पाडून घेतले. त्यांनी राष्ट्रवादीचे आण्णा बनसोडे यांचा पराभव करुन पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे.

Sachin Bhosale
सचिन भोसले
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत

 

 

 

सिमा साळवे
शैलेश मोरे

या मतदारसंघातून विद्यमान आमदारांसह अॅड. सचिन भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे इच्छूक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार आण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखऱ ओव्हाळ, विद्यमान नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर इच्छूक आहेत. भाजपकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, भीमा बोबडे इच्छूक आहेत. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका सीमा सावळे या देखील इच्छूक आहेत.

संदिप वाघेरे
मोरेश्वर भोंडवे
मयुर कलाटे

चिंचवड विधानसभा-
चिंचवड वधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे लक्ष्मण जगाताप विद्यमान आमदार आहेत. युतीमध्ये फुट पडल्यास शिवसेनेकडून राहुल कलाटे निवडणूक रिंगणात असतील. तर उपमहापौर सचिन चिंचवडे आणि नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भाजपकडून इच्छूक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर कलाटे हे इच्छूक आहेत. शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे हे देखील विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

भोसरी विधानसभा
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहे. मात्र, त्यांनी 2014 च्या निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक रवी लांडगे इच्छूक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक अजित गव्हाणे हे इच्छूक आहेत. युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला असल्याने शिवसेनेकडून इरफान सय्यद, धनंजय आल्हाट यांची तयारी सुरू आहे.

Visit : policenama.com