पिंपरी-चिंचवड : उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षक पदोन्नती मिळालेले 17 अधिकारी ‘कार्यमुक्त’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक निरीक्षकपदी बढती मिळालेल्या 17 पोलिस अधिकार्‍यांना आज (गुरूवार) पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी कार्यमुक्त केले आहे. त्यांना बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी आज दुपारनंतर कार्यमुक्त करण्यात आले आहे. कार्यमुक्त करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी प्रभारी अधिकार्‍यांच्या आदेशान्वये त्यांच्याकडील पदभार दुसर्‍या अधिकार्‍याकडे सोपवावा असे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.

कार्यमुक्त झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि पुढील कंसात सध्याची नेमणुक आणि बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे –

1. बिरूदेव निवृत्ती काबुगडे (भोसरी ते कोल्हापूर परिक्षेत्र)
2.हरिदास शिवराम बोचरे (पिंपरी ते ठाणे शहर)
3. निलेश एकनाथ बोडखे (सायबर कक्ष ते नाशिक परिक्षेत्र)
4. भरत विठ्ठलराव चपाईतकर (चिखली ते अमरावती परिक्षेत्र)
5. योगेश भास्कर शिंदे (चिखली ते औरंगाबाद परिक्षेत्र)
6. विवेक सुरेश वल्टे (हिंजवडी ते ठाणे शहर)
7. मनोज मोहन पवार (देहूरोड ते कोल्हापूर परिक्षेत्र)
8. श्रीकांत अंकुश पाटील (सांगवी ते नाशिक परिक्षेत्र)
9. अमित बाळासाहेब शेटे (वाकड ते सोलापूर शहर)
10. सुधीर योगीराज पाटील (सांगवी ते नाशिक शहर)
11. ईश्वर धुराजी जगदाळे (भोसरी एमआयडीसी ते नागपूर शहर)
12. सचिन विजय शिंदे (नियंत्रण कक्ष ते कोल्हापूर परिक्षेत्र)
13. रत्नमाला सावंत (चिखली ते मुंबई शहर)
14. रूपाली निवास पाटोळे (भोसरी एमआयडीसी ते मुंबई शहर)
15. श्रीकांत तानाजी शेंडगे (भोसरी एमआयडीसी ते नवी मुंबई)
16. वसंत शेषराव मुळे (आर्थिक गुन्हे शाखा ते नांदेड परिक्षेत्र)
17. हनुमंत प्रकाश बांगर (वाकड ते मुंबई शहर)

Visit : Policenama.com