पोलिस आयुक्तांच्या ‘त्या’ निर्णयामुळं बहुसंख्य पोलिस अधिकार्‍यांची ‘पळापळ’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस अधिकाऱ्यास गुन्ह्याचा तपासात हलगर्जीपणा करणे महागात पडणार आहे. २०१३ मध्ये दाखल गुन्ह्यात अद्याप काहीच तपास नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘आपणास सेवेतून निलंबित का करु नये’ अशी नोटीस बजावली आहे. पोलीस आयुक्तांनी ‘पेंडिंग’ गुन्ह्यांकडे लक्ष दिल्याने आणि कारवाईचे संकेत दिल्याने सर्वच अधिकाऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात २०१३ साली एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींनी ‘हायकोर्टात’ धाव घेतली. तेथे न्यायाधीशांनी तपास थांबविण्याचे आदेश दिले. यानंतर तक्रारदारांनी आपली बाजू मांडली. २०१७ मध्ये या गुन्ह्याचा तपास करुन योग्य कारवाई करण्याचे आदेश ‘हायकोर्टाने’ दिले. त्यांनंतर सदर गुन्हा संबंधीत अधिकाऱ्याकडे देण्यात आला.

२०१७ ते आज पर्यंत या गुन्ह्यात काहीच तपास झाला नाही. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावत ‘आपणास सेवेतून का निलंबित करु नये’ अशीही नोटीस बजावली आहे. यामुळे आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. कामचुकार पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

आज सकाळ पासूनच ‘पेंडिंग’ गुन्हे काढण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची पळापळ सुरु होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मीटिंग घेऊन सूचना दिल्या आहेत. मात्र आयुक्तांनी अश्या प्रकारे कारवाई केल्यास प्रत्येक पोलीस ठाण्यात कामचुकार पोलीस कर्मचारी, अधिकारी सापडणार हे नक्की आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास