पिंपरी : घरासमोर वाहन लावण्यावरून मायलेकाला दगडाने मारहाण ; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरासमोर वाहने लावण्यावरून मायलेकाला दगडाने मारहाण केल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर परस्परविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यात एकाला अटक केली आहे. ही घटना लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.

गणेश कातळे (२७), निवृत्ती कातळे (२४), पद्मा कातळे (४५), मेघराज मोहिते (२५) आणि अक्षय राजू सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रोशन राजू सावंत (२७, रा. लक्ष्मीनगर मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

रोशन राजू सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काकडे कुटुंब रोशन यांच्या घराशेजारी राहण्यास आहे. सोमवारी रात्री त्यांच्यामध्ये घरासमोर वाहने लावण्यावरून वाद झाला. यामध्ये गणेश कातळे याने रोशन यांच्या डोक्यात दगडाने मारून जखमी केले. तसेच रोशन यांच्या आईला ही मारहाण केली. याबाबत गुन्हा नोंदवून पोलिसांनी चौघांना अटक केली.

याच्या परस्परविरोधात ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय राजू सावंत याला अटक केली आहे. त्याच्यावर मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय सावंत याची आई फिर्यादी महिलेच्या मुलाला पार्किंगच्या कारणावरून मारहाण करत होती. फिर्यादी महिला भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता अक्षय त्याने त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

You might also like