किरकोळ भांडण भोवलं : तरुणाला गमवावा लागला शरीराचा ‘हा’ महत्वाचा पार्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात चामडी बेल्टने मारहाण करताना तो डोळ्याला लागल्याने एका तरुणावर कायमस्वरुपी एक डोळा गमाविण्याची पाळी आली आहे.

तौसिफ इक्बाल खान (वय २८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे या तरुणाचे नाव आहे. खान याच्या फिर्यादीवरुन पिंपरी पोलिसांनी रोहित मोटे (वय १९, रा संत तुकारामनगर, पिंपरी) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार संत तुकारामनगर येथील त्रिदेव इंटरप्राइजेसजवळ २८ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घडला होता.

तौसिफ खान आणि रोहित मोटे यांच्यात भांडणे झाली होती. तौसिफ हा त्याच्या गाडीवरुन जात असताना रोहित व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांच्या गाडी आडवी लावून तौसिफ याला थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करुन चामडी बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मारलेला बेल्ट तौसिफ याच्या डाव्या डोळ्यावर बसला. त्यामुळे त्यात तो गंभीर जखमी झाला. डोळ्यात जखम झाली. ही जखम बरी न होता ती चिघळून त्याला कायमस्वरुपी डोळा गमवावा लागला. त्याबाबत त्याने आता फिर्याद दिल्याने पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
You might also like