५ लाखासाठी विवाहितेला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करुन छळ केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पती प्रवीण दौंडकर, सासू कमल दौंडकर, सासरे जानकू दौंडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांना बंगला बांधायचा असल्याने पीडित महिलेकडे माहेरहून हुंड्याचे पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. महिला नोकरी करत असल्याने तिचा संपूर्ण पगार सासरच्यांना देण्यास सांगितले.

यावरून महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. सासूने पीडित महिलेला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तपास चाकण पोलीस करीत आहेत.