पुण्यात टोळीची दहशत माजविण्यासाठी ‘राडा’ ; दोघांवर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – ‘टॉवर लाईन’च्या मुलांवर आपल्या टोळीची दहशत बसावी या उद्देशाने एका टोळक्याने चार दोघांवर धारदार कोयत्याने प्राणघातक चढवला. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णानगर येथील सिमेंट ग्राउंड जवळ घडली.

या प्रकरणी यशपाल गौतम सरवदे (२३, रा. भालेकर चाळ, त्रिवेणीनगर, तळवडे) याने फिर्याद दिली आहे. तर तो यामध्ये जखमी झाला आहे. तुषार भंडारी, योगेश लहाने, गणेश तोरस्कर, पवन लष्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णानगर येथील सिमेंट ग्राउंड जवळ हा प्रकार घडला. यशपाल हा मोटरसायकल घेऊन थांबला होता. त्यावेळी गुन्हा दाखल असणारे त्याच्याजवळ आले आणि ‘टॉवर लाईनचे तुझे मित्र कुठे आहेत’ असे विचारले. ‘टॉवर लाईनचे त्याचे मित्र नसले म्हणून काय झाले, हा आहे याला मारून टाकू, म्हणजे टॉवर लाईनच्या मुलांमध्ये आपली दहशत बसेल’ असे म्हणत योगेश लहाने याने यशपालच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने मारले. गणेश आणि पवन यांनी यशपालला पकडले असता तुषार याने शेजारील आईस्क्रीमच्या हात गाडीवरील काचेच्या तीन ते चार ग्लास यशपालच्या डोक्यात फोडल्या.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास म्हेत्रे वस्ती चिखली येथून यशपालचा मित्र रोहित गोपने हा घरी जात असताना त्यालाही कोयत्याने मारून जखमी केले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये यशपाल आणि त्याचा मित्र रोहित हे दोघेही गंभीर जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.