‘त्या’ अनैतिक संबंधांतून झालेल्या तरूणाच्या खूनाच्या तपासप्रकरणी २ पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई !

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधांबाबत विचारपुस करायला गेलेल्या तरुणाचा खून तब्बल तीन महिन्यानंतर उघडकीस आला. या संपूर्ण घटनेत तळेगाव दाभाडे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार आहे.

अक्षय दीपक यादव (29, रा. सोमवार पेठ, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार किरण निर्गुण बोडके, केतन महेंद्रकुमार भालेकर (26, रा. वडगाव मावळ), नरेंद्र गोरखनाथ ढोले (36, रा. तळेगाव दाभाडे), निखिल दिलीप बोडके (25, रा. गहूंजे, ता. मावळ), ओंकार विलास बोडखे (21, रा. गहूंजे, ता. मावळ), सोन्या बोडखे (रा. गहूंजे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पत्नीचे किरण याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अक्षय यांना होता. त्याबाबत अक्षय आरोपी किरण बोडके याला विचारणा करण्यासाठी गहूंजे येथे गेला असता वादावादीतून भांडणे झाली. त्यावेळी अक्षयला दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पावर यांनी करून अक्षय यादव याचा अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत रविवार (दि.30) रोजी खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय याला मारहाण झाली असल्याची माहिती असताना देखील तळेगाव दाभाडे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली. या प्रकरणात पोलिस अधिकारी, कर्मचारी दोषी असल्याचा संशय आल्याने पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खातेअंतर्गत चौकशी सुरु केली आहे. यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा आणि दोषी आढळून आले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळल्याने दोन अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणार आहे.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा