हिंजवडी आणि तळेगाव मध्ये जबरी चोरीचा प्रकार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हिंजवडी, द्रौपदा लॉन्स येथे ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या दोघांचे दोन मोबाईल हिसकावले तर तळेगाव दाभाडे येथे ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले.
हिंजवडी पोलीस ठाण्यात महेंद्र अशोक मोरे (२९, रा. अनंतानगर, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

मोरे हे पद्मभूषण चौकात १० मे रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी मोरे यांचा सात हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. दुसरी घटना हिंजवडीतील द्रौपदा लॉन्सजवळ घडली. अधिश निगम हे त्यांच्या पत्नीसोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात होते. दुचाकीवरील तिघा चोरट्यांनी त्यांचा २५ हजार रूपयांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

तळेगाव दाभाडे येथील घटनेप्रकरणी लीला सूभाष डुंबरे (७०, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. लीला या वतनगनर येथील रस्त्याने वॉकींग करत होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी लीला यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले. तपास तळेगाव पोलीस करत आहेत.