सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची त्वरीत फेरनिविदा काढावी : नगरसेविका मंजुषा नागपुरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येणार्‍या उड्डाण पुलासाठीच्या कामाची निविदा १८ टक्के अधिक दराने आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पुलाची नितांत आवश्यकता असून महापालिका प्रशासनाने त्वरीत फेरनिविदा काढावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.

मंंजुषा नागपुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे. यासोबतच पु.ल. देशपांडे उद्यान ते फन टाईम थिएटर व इंडियन ह्यूम पाईप ते दुधाने लॉन्स या रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून सिंहगड मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल व नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

You might also like