‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निम्मित कवी महाबली मिसाळ निर्मित ‘एक मैफिल कवितांची…’ कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निम्मित शिरूर(घोडनदी) न्यायालयाच्या आवारात कवी महाबली मिसाळ निर्मित एक मैफिल कवितांची या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमानिम्मित प्रसिद्ध कवी महाबली मिसाळ, कवी सोमनाथ चौधरी व कवयित्री रुपाली साळवे तसेच अ‍ॅड दिलीप कांबळे, स्टेनो झाडे यांनी सर्व वकील पक्षकार यांच्या समोर आपल्या सुंदर कविता सादर केल्या. सर्वांनी कवितेनं मन जिंकलं.
poem
या कार्यक्रमास शिरूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस आर बांदल, सहन्यायाधीश अ‍ॅड. आर डी हिंगनगावकर, सहन्यायाधीश अ‍ॅड. एस मुंढे तसेच बार असोसिएशनचे सयाजी गायकवाड, उपाध्यक्षा रंजना घाडगे, उपाध्यक्ष उदय शेरकर, संघटनेचे सचिव अ‍ॅड प्रा. साहेबराव जाधव, अ‍ॅड सुहास ढमढेरे, माजी अध्यक्ष संजय ढमढेरे, घोडगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड आर बी थोरात, अ‍ॅड आदित्य मैड, अ‍ॅड विरेंद्र सावंत, अ‍ॅड सीमा काशीकर, अ‍ॅड खेडकर व सर्व वकिल तसेच कोर्ट स्टाफ पक्षकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड साहेबराव जाधव यांनी केले. आदित्य मैड यांनी विशेष सहकार्य केले .
तसेच मनोज दीक्षित हे ‘एक मैफिल कवितांची’ या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. अ‍ॅड विक्रम पाटील, अ‍ॅड सीमा काशीकर ह्यांनी सर्वांचे आभार मानले.

एक मैफिल कवितांची या बहारदार कवी संमेलनासाठी कवी महाबली मिसाळ (मो- 9730344041) यांना पंचक्रोशीतून अनेकजण संपर्क साधत असतात.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like