रिटायर्ड DySp कडून पोलीस उपनिरीक्षकाला ‘धक्काबुक्की’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – विरुद्ध दिशेने कार घेऊन येऊन वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्यांना गाडी मागे घेण्यास सांगितल्याबद्दल दोघा निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार नगर रस्त्यावर शनिवारी घडला. सर्वसाधारण नागरिकांकडून रस्त्यावर अडविल्याबद्दल यापूर्वी वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की प्रसंगी मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, दोघा निवृत्त विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी वर्दी उतरल्यानंतरही त्याच रुबाबात पोलीस उपनिरीक्षकाला भररस्त्यावर मारहाण करण्याची ही पहिलीच घटना असावी.

याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी तुकाराम जाधव आणि पाटील राखपसरे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष लांडे यांनी फिर्याद दिली आहे.

संतोष लांडे आणि पोलीस नाईक होनमाने, नागरगोजे हे २९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून लोणीकंद ते थेऊर रोडवरील वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून नियमन करीत होते. संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर रोडने जात असल्याने तो रोड बंद केला आहे. त्यामुळे या रोडवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचे नियमन करीत असताना जाधव, राखपाखरे हे थेऊर दिशेने विरुद्ध दिशेने आले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने लांडे यांनी त्यांना गाडी मागे घेण्यास सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगणारा तू कोण, मी रिटायर्ड पोलीस आहे. माझी ओळख दाखवून तुझी नोकरी घालवीन. तुला कामाला लावीन असे म्हणाला. जाधव याने मी रिटायर्ड डी वाय एस पी आहे. मी इथला लोकल आहे. मला नडु नकोस, तुला जड जाईल, गावातील लोक बोलावून रस्ता रोखो करतो. असे म्हणून कोणाला तरी फोन करु लागला.

त्यापाठोपाठ गाडीतून तिघे जण उतरले व त्यांनी लांडे यांना धक्काबुक्की केली. रिटायर्ड डीवायएसपी म्हणणारा त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर ते गाडी सोडून निघून गेले. पोलिसांनी त्यांची गाडी पोलीस ठाण्यात आणून लावली. लोणीकंद पोलिसांनी दोघा निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर