पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश सहायक पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी आज (मंगळवार) काढले. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांना नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव त्या पुढील कंसात कोठून कोठे

1) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मारुती मेश्राम (पाचपावली पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा नागपूर शहर)

2) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग बापुराव पोटे (जरीपटका पोलीस स्टेशन ते वाहतुक शाखा नागपूर शहर)

3) पोलीस निरीक्षक खुशाल व्ही. तिजारे (वाहतुक शाखा नागपूर शहर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक जरीपटका पोलीस स्टेशन, नागपूर शहर)

4) पोलीस निरीक्षक किशोर दर्वास नगराळे (विशेष शाखा, नागपूर शहर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली पोलीस स्टेशन)

Visit : Policenama.com