पुरंदर तालुक्यात डाळिंब चोरीचं प्रमाण वाढलं

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे, सुकलवाडी, बाळाजीची वाडी, राख, पिसुर्टी येथे दुष्काळी परिस्थितीत टॅंकरने पाणी घालून डाळिंब जगविले. श्रावण महिन्याच्या उपवासामुळे त्या डाळिंबांना चांगलाच भाव मिळून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत होते. मात्र दुसरीकडे त्यांच्या या कष्टावर आयता डल्ला मारणाऱ्या चोरांनी शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

दिवसा छुप्या मार्गाने शेतात घुसून डाळींबाचे चोरी केली जात असून त्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यावरही यांच्यावर कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसुर्टी येथील शेत जमिनीच्या गट नंबर १८४ मध्ये असणाऱ्या डाळिंबाच्या बागेत पहाटे साडेपाचच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी डाळिंबाची तोडणी सुरू केली होती. मात्र त्यांची चाहूल दीपक चोरमले यांना लागली. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकी (स्प्लेंडर एम एच ४२ ए एम ६५०२, बजाज डिस्कवर एम एच ११ बीटी ९१६८) तेथेच सोडून पळून गेले. याबाबत दीपक चोरमले यांनी वाल्हे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली.

आरोग्यविषयक वृत्त –