घरात लग्न नाही, मग नाचतंय कुणासाठी ? : ॲड आंबेडकरांचा राज ठाकरेंना टाेला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – त्यांच्या घरात लग्न नाही, मग हे नाचतंय कोणासाठी, हे तर त्यांनी सांगाव, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबडेकरांनी राज ठाकरेंच्या सभांचा समाचार घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवगाव (जि. नगर) येथे आयोजित जाहीर सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, ‘लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का? आता हे कुणासाठी नाचते तेच कळत नाही.’

‘लाव रे तो व्हिडीओ’ या राज ठाकरेंच्या वाक्याबाबत बोलताना आंबेडकर यांनी टीका केली आहे. ‘मोदीजी तुम्ही स्वत: ला मागासवर्गीय म्हणता, मग त्यांच्यासाठी काय केलं ते सांगा. शिवाय स्वत:चे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढून जाहीर करावे, म्हणजे सर्वांना कळेल की तुम्ही मागासवर्गीय आहात की नाहीत’, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.