फडणवीस मुख्यमंत्री बनणे हा जनादेशाचा सम्मान : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपनेते व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर चांगलं आणि आम्हाला पाठिंबा दिला तर वाईट अशी शिवसेनेची भावना आहे असे जावडेकर म्हणाले आहेत.

 

प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘जनतेने युतीच्या सरकारसाठी मतदान केलं होत. मात्र जनतेने युतीला दिलेल्या जनादेशाचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेना स्वार्थासाठी काँग्रेससोबत जाण्याचं पाप करायला तयार झाली होती. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर चांगलं आणि आम्हाला पाठिंबा दिला तर वाईट अशी शिवसेनेची भावना आहे. मात्र राजकारणाची अशी तऱ्हा कुठे पहिली नव्हती.’

फडणवीस यांचे अभिनंदन करताना प्रकाश जावडेकर म्हणाले की , ‘पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. त्यांचे मुख्यमंत्री बनणे जनादेशाचा सम्मान आहे. कारण सत्तास्थापनेची जी खिचडी शिजत होती तो जनादेशाचा घोर अपमान होता. हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे.

Visit : Policenama.com