कैद्यांनी ४ लाखाची ‘ऑनलाइन’ शॉपिंग केल्याचे उघड

गुआंगडोंग : वृत्तसंस्था – सामान्यपणे तुरुंगांमध्ये कैद्यांना कोणत्याही खास प्रकारची सुविधा दिली जात नाही. भारतातील तुरुंगांची अवस्था तर अतिशय खालावलेली आहे. तेथे क्षमतेपेक्षा अधिक कैदी कोंबुन भरलेले असतात. पण एका तुरूंगात कैद्यांना खासप्रकारची सुविधा देण्यात आली आहे. दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील तुरूंगांमध्ये कैद्यांसाठी ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलंय. या माध्यमातून आता कैदी सुद्धा शॉपिंग करू शकणार आहेत.

कैद्यांसाठी महिन्यातून एकदा तीन हजार रूपयांचे साहित्य खरेदी करण्याची सुविधा दिली आहे. शॉपिंग मशीनमध्ये पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून ते लॉग इन करून ऑनलाईन शॉपिंग करू शकतील. याच वर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत गुआंगडोंग प्रशासनाने कोंगहुआ तुरूंगात पायलट प्रोजेक्ट राबवला. त्यात कैद्यांनी साधारण १३ हजार ऑर्डर्स दिल्या व साधारणपणे ४ लाख रूपयांची खरेदी केली होती.

तुरूंगात एका वार्ड बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोअर ऑनलाईन शॉपिंग टर्मिनलांनी सुसज्ज आहे. इथे कैदी दैनंदिन गरजांच्या वस्तू, खाद्य पदार्थ, सिगारेट व भेटवस्तूंसहीत २०० प्रकारच्या वस्तूंची खरेदी करू शकतात. याआधी कैदी खरेदीसाठी आपल्या हाताने लिहिलेली एक लिस्ट अधिकाऱ्यांना देत होते. अधिकारी वस्तूंची खरेदी करून कैद्यांना आणून देत होते. यात अनेक दिवस वेळ जात होता.

सिने जगत –

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो