प्रियांका चोप्राचा विना ब्लाउजचा व्हिडिओ लिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचा हॉट फोटो आणि हटके व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चक्क प्रियांकाने साडीवरती ब्लाउज न घालता डान्स करताना दिसत आहे. प्रियांकाने हॉट फोटोशूट ‘इनस्टाइल मैगजीन’ साठी फोटोशूट केले आहे.

याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. हे फोटोशूट करताना देसी गर्लचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती डांन्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रियांकाने साडीवर ब्लाउज न घालता डान्स करत आहे. डान्स करताना ती आपल्या साडीला सांभाळत डान्स करत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

या फोटोबाबत जेव्हा प्रियांकाशी चर्चा केली गेली तेव्हा तिने सांगितले की, ‘माझा एक प्रॉब्लेम आहे की, मी जेव्हा भारतीय लुक करते तेव्हा माझ्यात एक वेगळी एनर्जी येते. यासोबतच खास दिसण्यासाठी मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते. ‘