प्रियांका – निकच्या ‘त्या’ वृत्ताबाबत मोठा खुलासा ; प्रियंकाने केले फोटो शेअर

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास फेमस जोडी लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या वृत्ताचे प्रियंकाच्या पीआर व्यवस्थापकाने खंडन करत हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास हे सर्वात जास्त चर्चिले गेलेले ‘सेलिब्रिटी कपल’ आहे. मात्र एका इंग्लिश वेबसाईटने प्रियांका आणि निक यांच्यात वाद होऊ लागल्याने लवकरच घटस्फोट घेणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली.

प्रियांका आणि निकने घाईगडबडीत लग्न केलं आणि आता त्यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. दोघांनी घाईत मोठा निर्णय घेतला आणि आता त्यांचं लग्न धोक्यात आहे, प्रियांका खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकनं प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असं जोनस कुटुंबियांना वाटतं. असं या वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटलं होतं. या सर्व चर्चांवर प्रियांकाच्या पीआर व्यवस्थापकाने स्पष्टीकरण दिलं आहे.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास घटस्फोट होणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. प्रियांका -निकबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास घटस्फोट घेणार नाहीत. ते फ्लोरिडामधील मियामी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टीवर गेले आहेत.

दरम्यान, प्रियांकाने आपल्या कुटुंबीय तसेच मित्रपरिवारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like