प्रियांकाच्या या ‘लूक’ ला युजर्स ने केले ट्रोल, कोणी म्हणाले ‘भूतनी’ तर कोणी म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या अंदाजात तिला पाहिले आहे. तिचा नवीन नवीन लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये प्रियांका व निक एकत्र दिसले. ‘मेट गाला 2019’ कार्पेटवर दोघांनी वेगळ्या अवतारात एन्ट्री घेतली. प्रियांका हा अवतार पाहून चक्क लोकांनी तिची खिल्ली उडविली.

2017 मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा आणि निक पहिलीवेळ भेटले होते. या रेड कार्पेचवर त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. आणि मग त्यांचे लग्न झाले. त्यामुळ हा इव्हेंट त्या दोघांसाठी अविस्मरणीय आहे. यंदा ही त्यांनी याच रेड कार्पेटवर पुन्हा एकदा एन्ट्री केली. यामध्ये प्रियांकाचा लुक पाहण्यासारखा होता. यामध्ये हेअरस्टाइलिस्टने प्रियांकाला ‘अफ्रिकन कर्ल’ची हेअरस्टाईल दिली. यंदाच्या थिमनुसार प्रियांकाचा लुक परफेक्ट होता. मात्र, अनेकांना हा लुक आवडला नाही.

प्रियांका आणि निक दोघे आता पती-पत्नी आहेत. त्यामुळे दोघे एकत्र दिसणे सहाजिकच आहे. ते दोघे एका इव्टेंटमध्ये वेगळ्या अवतारात दिसून आले. यामध्ये तिने सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियांकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्टिल गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. या गाऊनमध्ये प्रियांका छान दिसत होती. या गाऊन सोबत तिने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने सगळ्यांना थक्क केले.

अनेकांनी तिची खिल्ली उडविली. त्याचबरोबर तिला पाहून अनेकांनी वेगवेगळ्या नावाने तिची खिल्ली उडविली. कोणी तिला विक्रम बेताल म्हटले तर कोणी निकला म्हणाले की, प्रियांकाचा ‘वेटर’ दिसतोय. काही युजर्सने चक्क प्रियांकाला ‘भूतनी’ म्हणून संबोधले.