प्रांताधिकार्‍यांवर वाळु माफियांचा प्राणघातक हल्‍ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्यावर वाळू माफियांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शिरपूर शहरातील महामार्गाजवळील शहादा टी पॉईंटवर गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात जात होते. त्यावेळी वाळू माफियांनी बांदल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर बांदल महसूल अधिकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाले. शिरपूर पोलीसांनी बांदल यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे हे पथकासह शिरपूरला रवाना झाले आहेत.

दरम्यान, बांदल यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शिरपूर व शिंदखेडा उपविभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सरु केले आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like